कारंजा तालुका मंडप, बिछायत, साऊंड असोसिएशन'चे धरणे आंदोलन कारंजा : (संदीप क़ुर्हे)
कारंजा येथे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी तहसील परिसरात कारंजा तालुका मंडप, बिछायत, साऊंड असोसिएशनने धरणे आंदोलन केले. सध्या संपूर्ण राज्यात कोरोना आजाराचे संकट आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात लाॅक डाऊन लावण्यात आले. दिनांक 23 मार्च 2020 पासून सर्वत्र लाॅक डाऊन सुरू असल्यामुळे लग्नसमारंभाच्या संबंधित असलेले सर्व व्यवसाय जसे बिछायत केंद्र, साउंड सर्विस, मंगल कार्यालय, फोटोग्राफी ,केटर्स, प्रिंटिंग प्रेस हे सर्व व्यवसाय कोरोनामुळे लग्नसमारंभ व इतर सामाजिक सोहळ्यावर बंदी आल्यामुळे या व्यावसायिकावर उपासमारीची पाळी आलेले आहे. कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र शासनाने लग्न कार्यालयाच्या किमान 50 टक्के क्षमतेवर परवानगी आज तारखेपर्यंत बरेच निवेदन देऊन सुद्धा न दिल्यामुळे आमची झालेली दशा व आलेल्या अनुभवातून पुढील येणाऱ्या लग्न समारंभासाठी सरकारने शिथीलता द्यावी. त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात विवाह संघर्ष समिती स्थापन करून आंदोलनास प्रारंभ केला आहे. तरी आमच्यावर कुटुंबावर आलेल्या उपासमारीचा विचार करून शासनाने आम्हाला न्याय द्यावा.
यावेळी मंडप बिछायत असोसिएशन, मंगल कार्यालय अँड लॉन असोसिएशन, घोडी अँड बँड असोसिएशन ,ऑर्केस्ट्रा मंच असोसिएशन, पुरोहित असोसिएशन, साऊंड लाइटिंग असोसिएशन, फोटोग्रफी असोसिएशन, फ्लावर डेकोरेशन असोसिएशन, कॅटर्स असोसिएशन व प्रिंटिंग प्रेस असोसिएशन या सर्व संघटना धरणे आंदोलनामध्ये सहभागी सहभागी होत्या.