वाशिम जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित तर ४६ जणांना डिस्चार्ज
कारंजा: (संदीप क़ुर्हे)
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील १, रिसोड तालुक्यातील लोणी येथील १, भापूर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, पार्डी ताड येथील ३, कारंजा लाड शहरातील मेन रोड परिसरातील १, गुरु मंदिर जवळील ३, पहाडपुरा येथील २, कामरगाव येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे.