जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित तर ४८ कोरोनामुक्त जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह –१४९४ ऍक्टिव्ह – ३६५ बरे झालेले रुग्ण – ११०२ तरीही जिल्ह्यात इतर जिल्ह्यापेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर चांगला

जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित तर ४८ कोरोनामुक्त


जिल्ह्यात आजपर्यंतए कूण पॉझिटिव्ह –१४९४


ऍक्टिव्ह – ३६५ बरे झालेले रुग्ण – ११०२ तरीही जिल्ह्यात इतर जिल्ह्यापेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर चांगला


कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि २५ ऑगस्ट


      जिल्ह्या प्रशासनाच्या प्राप्त माहिती नुसार आज जिल्ह्यात एकूण २० बधितांची नोंद झाली असून ४८ कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे 


आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील १, काळे फाईल परिसरातील २, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, वारा जहांगीर येथील ७, दोडकी येथील १, मालेगाव तालुक्यातील कोयाळी येथील १, कारंजा लाड शहरातील बालाजीनगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, आसेगाव पेन येथील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर आणखी ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याची नोंद झाली आहे.


 


कोरोनामुक्त झालेले रुग्ण


 


     वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील ७, शिंपी गल्ली येथील १, परळकर चौक परिसरातील १, सुंदरवाटिका येथील १, गुरुवार बाजार परिसरातील १, कोल्ही येथील २, अनसिंग येथील २, मंगरूळपीर शहरातील जि. प. शाळा परिसरातील १, संभाजीनगर येथील ४, शेगी येथील ४, गिंभा येथील ६, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, जुनी सराफा लाईन येथील २, भरजहांगीर येथील १, चिचांबाभर येथील ५, आसेगाव पेन येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 


  विद्यमान स्थिती


 


एकूण पॉझिटिव्ह –१४९४


ऍक्टिव्ह – ३६५ 


डिस्चार्ज – ११०२


मृत्यू – २६ (+१) 


 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)