मनोगत दोन समाजसेवकांचे

 


                       मनोगत


            संपूर्ण देशात संसर्ग जन्य अश्या कोरोना चा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढत आहे .आपले राज्य ही त्यापासुन सुटले नाही . माननीय मुख्यमंत्री  उध्दव जी ठाकरे , आरोग्य मंत्री राजेश जी टोपे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड, ना. अशोकरावजी चव्हाण ह्यांनी योग्य वेळी योग्य नियोजन करून कठोर निर्णय घेतल्यामुळे मुंबई , पुणे ठाणे, औरंगाबाद , नागपूर , रायगड , सातारा आदी जिल्हे सोडले तर उर्वरित जिल्ह्यात कोरोना विषाणू चे संक्रमण रोखण्यात राज्य सरकार ला यश आले आहे . तर वाशिम जिल्ह्यात सुदैवाने आजपर्यंत तरी डाॅक्टर मंडळी , पोलीस प्रशासन , सफाई कामगार , जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक, तहसीलदार , मुख्याधिकारी , पटवारी , नगराध्यक्ष सारख्या अनेक कर्तृत्ववान अधिका-यांनी तसेच पत्रकार बांधव ह्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत योग्य नियोजन केल्यामुळे च कोरोना चा शिरकाव झाला नाही. भविष्यात ही वाशिम जिल्हा च नव्हे तर राज्यातील आॅरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्हयात कोरोना चा मोठ्या प्रमाणावर शिरकाव न होण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक घरोघरी जाऊन त्या घरातील प्रत्येक सदस्यांची पूर्व कोरोना अथवा साधी मेडिकल चाचणी करण्याचें आवाहन वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जैन जिंतुरकर व वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस अब्दुल राजिक ह्यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकार ला केली आहे. खा. राहुल जी गांधी यांनी ह्यापूर्वी च केंद्र सरकार ला ह्या बाबत सुचना केली आहे.
       त्यात ताप , खोकला , दमा , सर्दी पडसे व हातपाय दुखने इ. समावेश असावा . मुंबई , पुणे व इतर राज्यातुन तसेच विदेशातुन कोणी आले असेल तर त्यांची चौकशी करून माहिती घ्यावी असे आवाहन ही आम्ही करीत आहोत 
        हे फार आव्हानात्मक काम असुन ह्या साठी नोंदणीकृत एनजीओ ( NGO Ragister ) , व नगरसेवक ह्यांची मदत घेण्यात यावी . उदा. वाशिम जिल्हयाचा विचार केला तर हा उपक्रम राबविण्यासाठी
       जिल्हयात तीन नगर परिषदा आहेत त्या प्रत्येक नगर परिषद मधील प्रत्येक वार्ड मध्ये एक कर्मचारी व एक नगरसेवक असे दोन दोन व्यक्ती ची नियुक्त करुन प्रत्येक घरोघरी जावुन माहिती घेण्यात यावी
       तसेच ग्रामीण भागातही पंचायत समिती सदस्यांची नियुक्ती करून अश्याप्रकारची मोहीम राबवावी राज्यातील काही शहर व ग्रामीण भागात अश्या प्रकारची मोहीम आजही राबविण्यात येत आहे पण राज्य पातळीवर सरकारने ही मोहीम सक्तीची करुन राबविली तर त्यात आणखी पारदर्शकता येईल. आजच्या परिस्थिति कोणताही नागरिक कोरोना च्या भीतीने स्वतःहुन चाचणी करुन घेण्यास पुढे येत नाही आहे ह्याबाबत ची माहिती वृत्तपत्राव्दारे व न्युज चैनल च्या माध्यमातून संपूर्ण राज्यातुन समोर येत आहे.
       नगर परिषद मध्ये साधारणतः प्रत्येक वार्ड हा अंदाजे 1500 ते 2000 लोकसंख्येचा आहे .एवढ्या मोठ्या वाडॅ मध्ये दोन कर्मचारी अपुरे पडत असतील तर प्रत्येक 500 लोकसंख्ये मागे दोन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे  अर्थात ह्या बाबतीत पोलीस प्रशासन , स्थानिक डाॅक्टर व पत्रकार ह्यांना विश्वासात घेऊन नियोजन करून चाचणी घेण्यात आली तर आॅरेंज व ग्रीन झोन मधील जिल्हयात कोरोना चा शिरकाव होणार नाही व भविष्यात होणारा मोठा धोका टाळता येईल .
     एनजीओ ह्यांची जोखीम जास्त असल्यामुळे शक्य असल्यास मानधन देण्याचा विचार व्हावा व सुरक्षिततेसाठी मास्क , सानिटायझर सारख्या वस्तू पुरविण्यात याव्यात तसेच कामात अडथळा निर्माण केल्यास अधवा काही दिरंगाई वा कसुर केल्यास कारवाई ची तरतूद करण्यात यावी त्याचप्रमाणे प्रत्येक सदस्यांच्या बोटावर चाचणी केल्या नंतर शाई लावण्यात यावी.