"शाश्वत जल विचार, सखोल मंथन" या विषयावर ऑन लाइन राज्यस्तरीय पाणी परिषद संपन्न
पुणे:( कारंजा वृत्तकेसरी ग्रुप) दि २६
कोरोनाच्या संकट समयी, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय पाणी परिषद ऑनलाईन पद्धतीने दि.२६ जुलै रोजी पुणे येथून आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये झुम आणि यूटूब चँनेलच्या माध्यमातून मोठ्या संख्येने जल कार्यकरर्ते सहभागी झाले.
स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि सहज जलबोध अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध सहयोगी संस्थांच्या योगदानाने हि पाणी परिषद अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया चे चेअरमन डॉ श्री प्रशांत खांडे यांनी स्वागतपर भाषण केला आणि त्यांनी फेडरेशनची वाटचाल, महाराष्ट्रातील पाण्याच्या प्रश्न यावर प्रकाश टाकला.
परीषदेचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री. जयंतराव पाटील यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, "सध्या राज्यात आरोग्य बाबत परिस्थिती लक्षात घेता एकत्र येणे शक्य नसतानाही हि पाणी परिषद घेऊन आयोजक आपले जलसाक्षरतेप्रती भान जागृत ठेवून आहेत, या पाणी परिषदेतील तज्ञ-अभ्यासकांचा सहभाग आणि यातून होणारे विचार मंथन शासनाला जलक्षेत्रातील धोरण ठरवताना नक्कीच उपयुक्त ठरेल, त्यासाठी परिषदेचा अहवाल नक्की शासनाकडे सादर करावा, त्यातील सूचनांचा नक्की विचार होईल" असे मत व्यक्त केले व उपस्थित सर्वाना शुभेच्छा दिल्या.
श्री. उपेंद्रदादा धोंडे यांनी पाणीपरिषद उद्देश समजावून सांगताना, "पाणी प्रश्नाबाबत विचार मंथन गरजेचे आहे, सध्या सुरु जलक्षेत्रात दिसणारे उत्सवीकरण आणि तांत्रीकतेचा अभाव यामुळे जलसंकट अधिक दाहक होईल हे वास्तव आहे आणि हे थांबवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे".
सकाळी १० वाजता सुरु झालेल्या या पाणी परिषदेत तज्ञ अभ्यासक सुनील जोशी, प्रदीप पुरंदरे, निलेश हेडा, अनिल पाटील, अमर हबीब, सुरेश खानापूरकर हे वक्ते कोणत्याही प्रकारे राजकीय अभिनिवेश अथवा टिकाटिप्पणी न करता जलक्षेत्रातील त्रुटी स्पष्ट करण्यात यशस्वी झाले. या परिषदेत जलक्षेत्रातील विविध कंगोरे समजून-उमजून विषयांची निवड करण्यात आली असल्याने सामाजिक संस्था प्रश्न, जलकायदे, नदीधोरण, शेती-कार्बन क्रेडिट, शेतकरी विरोधी कायदे, खारपणपट्टा आणि जल विषयक तांत्रिकता असे विविध विषय श्रोत्यांना एक नवा विचार देऊन गेले.
परिषदेत काही अनुभव कथनं सादर झाली. केवळ पाणी अडवले, पाणी जिरवले इतकेच बोलणे नव्हे तर जलसंधारणातील विविध पैलू उलगडून दाखविले गेले. शैलेंद्र पटेल (झरे वाचवा), सचिन कुलकर्णी (प्रशासकीय अनास्था), ईश्वर काळे (जल विज्ञान), दिपक श्रोते (लोकरेट्याची ताकद), मनिष घोरपडे (जल प्रदूषण), सतिश खाडे (सक्षम संस्था) प्रकाश चोले (पाणीवापर) असे प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव व त्यातील येणारे अडथळे पार करून कशा पद्धतीने काम यशस्वी केले हे सर्व उपस्थितांना समजून सांगितले.
कार्यक्रम समारोप प्रंसगी आदरणीय श्री. सुरेश प्रभू, खासदार (राज्यसभा) यांची उपस्थिती अतिशय महत्वपूर्ण ठरली. जेव्हा पाणी कमतरता असते तेव्हा सगळे त्याचा विचार करतात पण पाणी एक जैवसाखळी घटक आहे, जो सर्वस्पर्शी असल्याने . पाणी प्रश्नांबाबत परिषदेत सर्व बाबी लक्षात घेणे जरूरी आहे. पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी व जमीन, पाणी व वने, पाणी व शेती, पाणी व मार्केट, पाणी व माणसे अशा अनेक अंगाने विचार करून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भूगर्भातील पाणी आपण संपवत आहे, भुपृष्ठावरील पाणी प्रदूषित करत आहोत याकठे लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी निसर्गरक्षक संकल्पनेचाही विचार त्यांनी मांडला व याबाबत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
पाणी परिषद यशस्वी करण्यासाठी फेडरेशन कोअऱ सदस्य प्रीती काळे व निर्मल ठाकूर यांनी सूत्र संचलन आणि सुनील मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. मयूर बागूल , कपिश कोसळगे आणि प्रशांत कुंभार यांनी सर्व ऑनलाईन सुत्रे समर्थपणे हाताळली. सदरील परिषद घेण्यासाठी सर्व सहयोगी संस्था त्यात उदयकाळ फाउंडेशन, सहज जलबोध अभियान, समग्र नदी परिवार, अखिल रयत क्रांतीकरी संघ, महात्मा फुले समाज सेवा मंडळ, लायन्स क्लब इको फ्रेंड्स, रयत सेवक एजुकेशनल अँड मल्टीपर्पाज सोसायटी व मिडिया म्हणून शिवनेरी प्राईम यांनी सहकार्य केले.