संपूर्ण देशात सोन्याच्या एक सारख्या किंमती करा - ज्वेलर्स असोसिएशनची केंद्र सरकारकडे मागणी

संपूर्ण देशात सोन्याच्या एक सारख्या किंमती करा - ज्वेलर्स असोसिएशनची केंद्र सरकारकडे मागणी 


कारंजा :(न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधी अमित संगेवार)


     भारतात सोनं आयात केले जाते त्यावेळी त्याची किंमत एकच असते मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहरामध्ये ते वेगवेगळ्या किंमतीने विकलं जात असल्याने ग्राहकान मध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने संपूर्ण देशात


    ‘वन नेशन, वन गोल्ड’ही व्यवस्था लागू करन्याची मागणी ज्वेलर्स असोसिएशने सरकारकडे केली आहे 


    प्राप्त माहिती नुसार ज्वेलर्स असोसिएशनने अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत - त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात.


   त्यामुळे आपल्या देशात सध्या प्रत्येक भागात सोन्याचे दर वेगवेगळे राहतात म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या 


   दागिन्यांची किंमत १० ग्रॅमसाठी ४९,१०० रुपये इतकी होती - केरळमध्ये ती ४६,८५० रुपये होती तर आपल्या राज्यात मुंबई मध्ये ४९ ,६८० रुपये होती 


    तसे पाहले तर एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल - म्हणजे ते कुठल्याही राज्यातून एका भावात सोन खरेदी करु शकतील