महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल - मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल - मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती 


मुंबई : (न्यूज नेटवर्क) दि ५


राज्यात आता कित्येक महिन्या पासुन


 बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे


     राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून या नोव्हेंबर महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल. तर डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे 


   तसे पाहिले तर सध्या राज्यातील स्थिती सध्या बऱ्यापैकी पूर्वपदावर येत आहे ,आजपासून चित्रपट आणि नाटय़गृहे सुद्धा होणार आहेत 


   तसेच आजपासून इन्डोअर खेळांच्या केंद्रांना सुद्धा परवानगी मिळाली आहे - मात्र राज्यातील धार्मिक स्थळाबद्दल आणि शाळा कॉलेज बद्दल निर्णय होण्याचा बाकी आहे