बंजारा समाजाचे धर्मगुरु संत श्री रामराव महाराजांच्या जाण्याने भटके विमुक्तांचा आधार हरवला--परमहंस मुसळे वाशिम
वाशीम :(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यातिल तसेच जगभरातील बंजारा समाजाचे उर्जास्त्रोत,प.पुज्य संत शिरोमणी पोहरागडाचे वैभव श्रध्देय डाॕ रामराव महाराजाचे वयाच्या ८९ वर्षी निधन झाले त्यांच्या वैकुंठगमनानिमित्त भाजपच्या भटके विमुक्त अघाड़ी तर्फे श्रद्धांजली वाहन्यात आली. त्यावेळी भटके विमुक्तअघाड़ी प्रदेश कार्यकारिणी सद्यस्य परमहंस मुसळे यांनी स्व. रामराव महाराज यांच्या जाण्याने अखंड विश्वाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे असे प्रतिपादन केले. स्व रामराव महाराजांनी अध्यात्मा बरोबर आधुनिकतेची कास धरावी अशी शिकवण देली.महाराजांच्या जाण्याने भटके विमुक्तांचा आधार हरवला अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ह्यावेळी आघाडी सद्यस्य व कार्यकर्ते यांची उपस्थिति होती.