‘भाजयुमो’ वाशिम जिल्हा जंबो कार्यकारिणी जाहीर
वाशिम: (संदीप क़ुर्हे) दि ३
भाजयुमोची वाशिम जिल्हा जम्बो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे यांनी आज दि.३ नोव्हेंबर रोजी जाहीर केली.भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो प्रभारी चंद्रशेखर बावणकुळे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आ.रामदास आंबटकर यांच्या सूचनेनुसार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी, युवा नेते राजू पाटील राजे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो वाशिम जिल्हा कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे यांनी केली.
कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.हरिदास ठाकरे मंगरूळपीर, आनंद गडेकर-वाशिम, शे.मुद्दत्सीर शे.बशीर-मालेगाव, विनोद नरवाडे-रिसोड, स्वप्नील पाटील-मानोरा, सुमिर देशपांडे-कारंजा, संघटन सरचिटणीस पदी सुरज चौधरी-वाशिम, सरचिटणीसपदी बंटी उर्फ ईश्वर डेंडूळे-कारंजा, वैभव वायचाळ-मालेगाव, चिटणीसपदी अमित मानकर- वाशिम, महेश अहिरकर- मंगळरूपीर, गजानन कोकाटे-रिसोड, प्रविण चौधरी-मालेगाव, वैâलास मुंगनकर- वाशिम, विजय चव्हाण-मानोरा, रूपेश शहाकार-कारंजा, वाशिम विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर भोयर-मंगरूळपीर, रिसोड विधानसभा प्रमुख भारत नागरे-रिसोड, कारंजा विधानसभा प्रमुख आशिष राठोड- मानोरा, कोषाध्यक्ष शुभम बोनके-कारंजा, प्रसिध्दी प्रमुख भगवान कोतीवार-वाशिम, सोशल मिडीया प्रमुख सारंग निर्बाण रिसोड, शिवशंकर गाडेकर-वाशिम, विशेष निमंत्रीतमध्ये शैलेश वाडेकर-वाशिम, देवानंद शिंदे-वाशिम, विशाल गुप्ता मंगरूळपीर, चेतन होटे मंगळरूपीर, नागेश गव्हाळे रिसोड, किशोर राऊत रिसोड, मुस्तफाखॉ सरफराजखॉ मालेगाव, सुनिल राऊत मालेगाव,
संकेत नाखले कारंजा, डॉ.मनोज रसाळे कारंजा, शाम डोळस मानोरा, सामिल राठोड मानोरा, कार्यकारिणी सदस्यांमध्ये भारत केसवाणी, ज्ञानेश्वर कव्हर, भगवान काकडे, मिर्झा मुझफ्फर बेग, चेतन डहाके, दिनेश तलंग, नंदकिशोर मुळे, विरजीत गौर, किशोर करंगे, उत्तम बोडखे, अमोल लहाने, रवीराज घुगे, महादेव शिंदे, अमित लोखंडे, विनोद उपाध्ये, अमोल ढगे, गौरव कुर्मवंशी, विक्की कोळकर, निलेश वैद्य, प्रविण ढवक, युवती मोर्चा जिल्हा संयोजकपदी सौ.सोनाली गर्जे, सहसंयोजकपदी कु.वंदना खोटे, सौ.वैशाली खिराडे, विद्यार्थी विभाग जिल्हा संयोजकपदी सौरभ गंगावणे वाशिम, सहसंयोजकपदी अखिलेश बोरकर कारंजा आदींचा समावेश करण्यात आला आहे.