केंद्र सरकारी कार्यालयांतही आता मराठी भाषा होणार सक्तीची
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १
आपल्या राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर आता राज्यातील केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी भाषेच्या वापराची सक्ती केली जाणार आहे - याविषयीची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या त्रिभाषा सूत्रानुसार - प्रत्येक राज्यात हिंदी, इंग्रजी आणि संबंधित राज्याची राज्यभाषेचा वापर करणे अनिवार्य आहे.
मात्र आपल्या राज्यात अनेक कार्यलयात असे होत नाही - दरम्यान त्रिभाषा सूत्राची केंद्रीय कार्यालयांमध्ये कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे
अशी मागणी करणारे पत्र मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले होते - उत्तरात त्यांनी तशी अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिलेले आहे
या पार्श्वभूमीवर, त्रिभाषा सूत्राची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी मराठी भाषा विभागाने आणखी ठाम भूमिका घेतली आहे
यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मराठी भाषा विभागाने तयार केला असून - तो राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे पाठविन्यात आल्याची माहिती आहे