स्व. सौरव शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

स्व. सौरव शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १६  


      स्व. सौरव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक वारसा जपत सौरव शिंदे मित्र मंडळातर्फे शहरातील सरस्वती भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ रक्त पेढी यावेळी या शिबिरा करीता सहकार्य लाभले आहे 


   कोरोनासारख्या कठीण काळात महराष्ट्रसह संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असताना अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. स्व. सौरव शिंदे याच्या आठवणीस ऊजाळा म्हणून दरवर्षी सौरव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराकडून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात असते त्याप्रमाणेच याववर्षी देखील रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 80 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरासाठी तहसीलदार धीरज मांजरे साहेब आणि कारंजा पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी विशेष सहकार्य केले. सोबतच सौरव शिंदे मित्र परिवारातील प्रथमेश जिरापुरे , संकेत उजवे , प्रणव काटकर , शुभम भगत, संकेत वंजारे ई. विशेष परिश्रम घेतले.