वाशिम जिल्ह्यात आणखी ४८ कोरोना बाधित; १०९ जणांना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात आणखी ४८ कोरोना बाधित; १०९ जणांना डिस्चार्ज


कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि 2


जिल्ह्या प्रशासनाच्या काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील ४, समर्थनगर येथील १, कासारगल्ली येथील २, अनंत कॉलनी परिसरातील ४, माळीपुरा येथील १, पळसखेड येथील १, देगाव येथील १, मालेगाव शहरातील १, शिरपूर जैन येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, बरालिंग मंदिर परिसरातील ३, शिवाजी नगर येथील १, यशवंत कॉलनी परिसरातील २, आदर्श कॉलनी परिसरातील १, खेर्डा येथील १, धनज येथील १, धोत्रा येथील १, मंगरूळपीर शहरातील बाबरे नगर येथील १, नाथनगर येथील २, जिल्हा परिषद शाळा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, वनोजा येथील १, सनगाव येथील १, भडकुंभा येथील १, शेलूबाजार येथील २, शिवणी येथील १, पिंप्री येथील १, आसोला येथील १, मानोरा तालुक्यातील कार्ली येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


 


दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०९ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या धोडप, देपूळ व पेनबोरी येथील प्रत्येकी १ अशा एकूण ३ मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.