शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अन्यथा मंत्र्यांना जिल्हाबंदी-- डॉ.बोंडे
कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि २९
सततच्या पावसामुळे उडीद, मूगासह सोयाबीन, कपाशी व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना शासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अन्यथा मंत्र्यांना जिल्हाबंदी करू असा इशारा माजी कृषी मंत्री तथा भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी दिला. कारंजा येथे आयोजित हुंकार बळीराजाचा आंदोलनात ते बोलत होते.
सरकारवर चौफर टिका करत, सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे त्यांनी सांगितले. हजारो हेक्टर शेतजमिन बाधित असतांना आयुक्तांनी केवळ ६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित दाखविले. किमान जिल्हा कृषी अधीक्षकांचा अहवाल ग्राह्य करून शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील उदीड, मूगासह सोयाबीन, कपाशी व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासन तसेच प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करून सुध्दा सरकार साफ दुर्लक्ष करित आहे. पंचनामे न करता केवळ अतिवृष्टी निकषात बसत नसल्यामुळे मदत नाकारणे हा शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता आता तरी सरकारने जागे व्हावे अन्यथा या आंदोलनाच्या ठिंणगीचे वनव्यात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही असेही आमदार पाटणी म्हणाले.
कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ललित समुंदरकर, जिल्हा नेते राजु पाटील राजे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, संघटन महामंत्री सुनिल राजे, सुनिल काळे, शाम बढे, नागेश घोपे, मंडळांचे अध्यक्ष डॉ.राजीव काळे, ललित चांडक, ठाकुरसिंग चव्हाण, रविंद्र ठाकरे, शाम खोडे, प्रल्हाद गोरे, राहूल तुपसांडे, किसान प्रदेश सदस्य विनोद जाधव, जिल्हा पदाधिकारी नितीन काळे, विजय काळे, सौ.मिनाताई काळे, जिल्हा उपाध्यक्ष जयकिसन राठोड, विजय पाटील, अनिल कानकिरड, खुशाल पाटील ढोणे, धनंजय हेंद्रे, जि.प.गटनेता उमेश ठाकरे आदींसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्यांची उपस्थिती लाभली होती.