वाशिम जिल्ह्यात आणखी आढळले ४० कोरोना बाधित ७० जणांची कोरोना वर मात

वाशिम जिल्ह्यात आणखी आढळले ४० कोरोना बाधित ७० जणांची कोरोना वर मात


कारंजा :(संदीप क़ुर्हे) 


     जिल्ह्या प्रशासना च्या काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील १, बाहेती ले-आऊट येथील १, समर्थ नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, लाखाळा परिसरातील ६, आययुडीपी येथील २, बसस्थानक समोरील परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, देवपेठ येथील १, योजना कॉलनी येथील १, चांडक ले-आऊट येथील १, जुनी आययुडीपी येथील २, तामसी येथील १, सावरगाव बर्डे येथील ४, अनसिंग येथील १, मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे येथील १, मंगरूळपीर शहरातील १, सोनखास येथील १, नागी येथील १, पिंपळखुटा येथील २, हिरंगी येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, क्षीरसागर मळा येथील १, एकलासपूर येथील १, कारंजा लाड शहरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७० व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर बाधित आढळलेल्या ३७ रुग्णांची नोंद आज घेण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेर उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आज पोर्टलवर झाली आहे.