आता दहावी पास विद्यार्थीही सीए फाऊंडेशनसाठी नोंदणी करू शकतील - विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी
कारंजा:(संदीप क़ुर्है) दि २१
इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ट्ड आकाऊंट्स ऑफ इंडियाने आता एक नवीन निर्णया जाहीर केला असल्याची माहिती आहे
प्राप्त माहिती नुसार दहावी पास विद्यार्थीही आता सीए फाऊंडेशनसाठी करु नोंदणी शकणार आहे वास्तविक
तसे पाहिले तर आतापर्यंत बारावी पास विद्यार्थीच सीए फाऊंडेशनसाठी नोंदणी करण्यास पात्र होते
मात्र आता आयसीएआयच्या आज झालेल्या नव्या या निर्णयानंतर दहावी पास विद्यार्थीही या कोर्ससाठी करु नोंदणी शकणार आहे
विद्यार्थी eservices.icai.org या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करु शकतात - मात्र, विद्यार्थ्याला बारावीची परिक्षा पास केल्यानंतरच -
फाऊंडेशन कोर्समधील प्रोव्हीजीनल ऍडमिशनला नियमित केले जानार असले तर मग निर्णयाचा फायदा काय होणार ? असा तुम्हचा प्रश्न असेल
तर यानुसार दहावी पास विद्यार्थी सीएच्या पहिल्या एंट्री लेव्हलच्या परिक्षेसाठी नोंदणी करु शकतील - ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ खूप वाचणार असे म्हणायला हरकत नाही