श्री. कामाक्षा माता मंदिरात पारंपारिक गोंधळ व जोगव्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न !

श्री. कामक्षा माता मंदिरात पारंपारिक गोंधळ व जोगव्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न !                 


    कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २२


    श्री नवरात्रोत्सव निमित्ताने लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री कामाक्षा देवी मंदिरात शेकडो भाविक श्रीदेवी उपासकांच्या साक्षीने बुधवारी आश्वीन शुध्द षष्टीच्या जोगव्याचा कार्यकम आई श्री कामाक्षा माता गोंधळी कला संच कारंजा तथा जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजा चे वतीने रात्री साडेसात वाजता महाआरती नंतर संपन्न झाला त्यावेळी श्री कामाक्षा मातेचे मानकरी गोंधळी हभप . ज्ञानेश्वर विठ्ठलराव क डोळे उपस्थित होते .                   यावेळी गोंधळी हभप संजय मधुकर क डोळे, कमलेश ज्ञानेश्वर क डोळे, दिनेश ज्ञानेश्वर क डोळे, सुरेश रामभाऊ हांडे, कैलास सुरेश हांडे, विजय बाबुराव खंडार, ज्ञानेश्वर खंडारे, प्रतिक राजू हांडे, अथर्व' क डोळे, संस्कार क डोळे, इ.. गोंधळी लोक कलावंतानी जोगवा सादर केला . या बद्दल अधिक वृत्त असे की , कारंजाच्या मध्यवर्ती भागात . मंगरूळ वेश परिसरात नगर परिषद कार्यालयाजवळ गोंधळी नगरात आतिशय पुरातन असे ऐतिहासिक श्री. कामाक्षा माता मंदिर आहे . या मंदिराची स्थापना कारंजा नगरीचे संस्थापक सप्तश्री करंजऋषीचे पूर्वीची असावी . तसेच येथे शिवछत्रपती शिवराय दर्शनार्थ आल्याची आख्यायीका आहे . अशा हया प्राचिन मंदिराचा कारभार सध्या येथील महाजन कुटूं बी याकडे असून सध्या हभप . दिगंबर पंत महाजन महाराज मंदिराचे व्यवस्थापन पाहतात . येथे दरवर्षी मोठी यात्रा असते . परंतु को व्हीड१९ कोरोना महामारामुळे इतिहासात प्रथमच मंदिर व्यवस्थापनाने स्वतःहून शेकडो वर्षाची परंपरा मोडीत ही यात्रा स्वतःहून रद्द केली आहे . श्री. कामाक्षा मंदिराचे संचालक प्रा राहुल महाजन, रोहीत महाजन यांनी सामाजिक अंतर राखून दर्शनाची चोख व्यवस्था केली असून सॅनिटायझर्स घेवून व मास्क ( मुखोच्छादन ) लावून च मंदिरात प्रवेश दिला जात आहे . असे प्रसिद्धीपत्रकात म्हटलेआहे .