वाशिम जिल्ह्या कन्ट्रोल मध्ये ,कोरोना रुग्नसंख्या घटली जिल्ह्यात आढळले फक्त २८ कोरोना बाधित,२५ जणांना डिस्चार्ज,उपचार घेणारे रुग्नसंख्या ६६०
कारंजा : (संदीप क़ुर्हे) दि ०९
वाशिम जिल्ह्यात घटती रुग्नसंख्या पाहता कन्ट्रोल करण्यात प्रशासनाला यश आल्याचे दिसते, आज जिल्ह्यात फक्त २८ कोरोना बाधित आढळले असून ,२५ जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहे तर उपचार घेणारे रुग्नसंख्या ६६० आहे
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील चंडिकावेस येथील १, कारागृह परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील १, टिळक चौक येथील १, राजनी चौक येथील १, साई नगर येथील १, पंचशील नगर येथील १, उमरा कापसे येथील १, देपूळ येथील १, खंडाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, वनोजा येथील १, हिरंगी येथील ३, मोहरी येथील ४, धानोरा खुर्द येथील २, नागी येथील १, रिसोड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मैराळडोह, वाघी बु., तोंडगाव आणि कारंजा लाड येथील प्रत्येकी १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.