कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना तात्काळ शासन मदत देन्याची कारंजा तालुका भाजपाची मागणी

कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना तात्काळ शासन मदत देन्याची कारंजा तालुका भाजपाची मागणी


कारंजा :(संदीप क़ुर्हे)


    कारंजा तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून प्रशासनामार्फत शेतकऱ्याना तात्काळ शासन मदत करण्याची मागणी तालुका भाजपा तर्फे तालुका अद्यक्ष डॉ राजीव काळे व शहर अद्यक्ष ललित चांडक यांनी केली आहे तहसीलदार कारंजा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतात वीज पडून अपघाती मृत्यू झालेल्या शेतकरी परिवाराला तत्काळ आर्थिक मदत देणे , वन्यप्राण्यांच्या हौदोसामुळे जे शेतकरी वर्गाचे शेती पिकाचे नुकसान होत आहे ,


      त्याची नुकसान भरपाईसुद्धा तत्काळ शेतकऱ्यांना मिळणे व यातून काही शेतकरी व शेतमजुरांवर वन्य प्राण्यांचे हल्ले झाले , त्यांनासुद्धा नुकसान भरपाई मिलावी ,गेल्या काही दिवसांपासून आमच्या कारंजा तालुक्यात नैसर्गिक अतिवृष्टीने अतिझोडपले आहे . गेल्या ऑगस्ट महिन्यापासून या परिसरात संततधार पाणी सुरु आहे . अगोदर शेतकन्यांचे मुंग - उडीद पिक संपूर्णतः हातचे गेले नंतर सोयाबीनसुद्धा काही ठिकाणी सढले , काही ठिकाणी त्यांच्या शेंगाना कोंबे फुटले . त्याची प्रती एकरीउत्पादनसुद्धा घटले . आता शेतकयांनी चढ्यादराने मजुरी देऊन आहे ते सोयाबीन पिके शेतातून काढण्याचा प्रयत्न केला .


     अगोदरसुद्धा कारंजा तालुका परिसरात अतिवृष्टी झाली . दिवसभर मुसळधार पाण्याने संपूर्ण तालुका परिसराला झोडपले . शेतातील सोयाबीनची झाडे जागेवरच सडली . काही सोयाबीन पिके मशीनवर व शेतात सोयाबीनच्या गंज्या सडत आहे . शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास आता हिरावला गेला आहे . तसेच कापूस पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे . अनेक ठिकाणी बोंडे लाल झालीत . काही ठिकाणी गळून पाडला आंनी तुरीची व शेतातील सर्व पिके अतिवृष्टीमुळे सइली आहेत , खराब झाली आहेत आणि कारंजा तालुक्यात पिंपळगाव गुंजाटे व नारेगाव येथे वीज पडून शेतकरी परिवारात दुर्दयी , अपघाती मृत्यू या अतिवृष्टीमुळे दि . 11/10/2020 ला झाली . आणि परिसरात वन्य प्राण्यांनीसुद्धा हौदोस घातला असून परिसरात अनेक शेतकन्याच्या शेतीपिकांची नासाडौं ते करित आहे . काही ठिकाणी शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर वन्यपान्यांनी हल्लेसुद्धा केले व त्याना जखमी केले आहे . अतिवृष्टीमुळे खराब झारनेल्या सर्व शेती पिकांसाची संपूर्णा तालुक्यात प्रशासनामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे . 


    कारंजा तालुक्यात संपूर्णतः ओला दुष्काळ जाहीर करावा . संपूर्ण दुष्काळग्रस्त शेतकरी वर्गाला तत्काळ शासन मदत देण्यात यावा,वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत करावी , वन्यप्राण्यामुळे न शेतीपिकाचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपार्च शायौ था जणामी शेतकरी , शेलमालास तत्काळ आर्थिक मदत दयावी.असे निवेदंन श्री.डॉ.राजीव काळे ता.अध्यक्ष व शहर अध्यक्ष श्री ललीतजी चांडक ,जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गुड्डू पाटील कानकिरड संकेत नाखले संतोष गुल्हाने रुपेश शाहाकार दिपक डफडे शुभम बोनके प्रमेश्वर भाऊ आंबले सुभाष कदम राजुभाऊ घोडे शशीभाऊ वेरुळकर जिगनेश लोडाया अमोल बीजवे यांच्या उपस्थीतीत दिले यावेळी भाजपा शहर व ता.पदाधीकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते