तहसीलदार कारंजा यांच्या कोरोना तपासणी आवाहनाला कारंजा तालुका केमिस्ट संघटनेचा उस्फूर्त प्रतिसाद.
कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि 5
सम्पूर्ण जग,समाजमन मागील ६ महिन्यापासुन कोरोना च्या सावटाखाली जीवन जगत आहे कुठे कोरोना मुळे होणारे मृत्यु चे आंकड़े पाहत आहोत तर कुठे वाढती रुग्नसंख्या पाहण्यास मिळत आहे सम्पूर्ण आर्थिक घडी विस्कटलेली आहे परिणामतः प्रशासनाने जागोजागी कोरोना टेस्ट वाढवून प्रत्येक शहरातील दुकानदार व त्यामधील कर्मचारयांची टेस्ट करने बंधनकारक करण्यात आले आहे अशातच
गेल्या सहा महिन्यांपासून करोनाच्या वाढत्या प्रकोपातही केमिस्ट आपले कर्तव्य अहोरात्र बजावत आहेत. लॉक डाऊन मध्ये सर्व दुकाने बंद असताना, अति जीवनावश्यक वस्तू मध्ये औषधी दुकाने चोवीस तास सुरू ठेऊन , सर्व केमिस्टनी आपल्या व्यवसायासोबतच उदात्त समाज सेवेचा परिचय दिला. डॉ कडे जायला घाबरत असताना , लोकांना योग्य औषधोपचार करण्याची जबाबदारी केमिस्टनी घेऊन त्यांना असलेल्या औषधी ज्ञानाचा परिचय दिला. सामाजिक बांधिलकी जपून अनेकवेळा पोलीस मित्रांना , व गरजूंना सॅनिटायझर व मास्कचे अनेक वेळा संघटनेकडून वितरण करण्यात आले. केमिस्ट उपलब्ध असलेल्या अपुऱ्या सुरक्षितेत जोखीम घेऊन आपले कार्य अविरत करीत आहेत हे उल्लेखनीय. कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आवाहनाला संपुर्ण तालुक्यातील कारंजा तालुका केमिस्ट संघटनेच्या सर्वच सदयस्यानी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड RTPCR टेस्ट करुण घेतल्या .
तालुक्यातील जवळपास एकशे वीस केमिस्टनी या वेळी आपल्या RTPCR टेस्ट करून घेतल्याची माहिती, कारंजा तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आशिष बंड जैन यांनी दिली. अतिशय काळजीपूर्वक तपासणी साठी सर्व ग्रामीण रुग्णालय स्टाफ यांचे संघटनेतर्फे आभार मानण्यात आले. या वेळी सर्व केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.