आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित ३१ जणांना डिस्चार्ज
कारंजा :(संदीप क़ुर्हे)
आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित आढळले असून ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जैन कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील ४, टिळक चौक येथील १, मोठा गवळीपुरा येथील १, राजनी चौक येथील १, सुभाष चौक येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, सावरगाव बर्डे येथील २, सुपखेला येथील १, बिटोडा तेली येथील १, रिसोड शहरातील १, क्षीरसागर मळा येथील १, लोणी फाटा येथील २, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, बेलखेड येथील १, मोहरी येथील १, नागी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. दोन येथील १ व इतर ठिकाणचे २, मानोरा तालुक्यातील चिखली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.