प्रहार समावेशित विशेष शिक्षक संघटनेच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी सचिन घुले यांची निवड
कारंजा :(प्रतिनिधी संदीप क़ुर्हे)
महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष तथा मार्गदर्शक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित ,प्रहार समावेशित विशेष शिक्षक संघटनेच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी कारंजा पंचायत समितीमधील विशेष शिक्षक सचिन उत्तमराव घुले यांची निवड करण्यात आली . संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात राज्य अध्यक्ष रणजित अरुणराव देशमुख व अमरावती विभाग प्रमुख रणजित सुरवाडे यांनी ही निवड केली.
संघटनेच्या वाशिम जिल्हा शाखेतील अन्य पदांसाठी निवड झालेले विशेष शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत -जिल्हा उपाध्यक्ष केशव गायकवाड रिसोड,
जिल्हा सचिव धिरज अंभोरे वाशिम,जिल्हा कोषाध्यक्ष राहुल साबळे वाशिम, जिल्हा सहसचिव सुमित साखरे मंगरुळपीर,जिल्हा संपर्क प्रमुख उमेश खील्लारी वाशिम, प्रसिध्दी प्रमुख लालबा लवटे वाशिम, जिल्हा सल्लागार राजेश नेमाडे मालेगांव,महिला प्रतिनिधी कु . मनिषाताई खाडे मंगरुळपीर, ज्योतीताई कोपनार कारंजा,जिल्हा संघटक भांबरुनकर मानोरा,जिल्हा मार्गदर्शक संतोष तायडे मंगरुळपीर, गोकुल आडे रिसोड.
दरम्यान संघटनेच्या वाशिम जिल्हा शाखेसाठी पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या सर्व विशेष शिक्षकांचे प्रहार समावेशित शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशपाक निसार खान, राज्य सचिव सम्राट खोब्रागडे, अमरावती विभाग प्रमुख रणजित सुरवाडे यांनी अभिनंदन केले.