जिल्ह्यात आणखी ६६ कोरोना बाधित; ४९ जणांना डिस्चार्ज आजपर्यंत एकूण बाधीत ५०३१

जिल्ह्यात आणखी ६६ कोरोना बाधित; ४९ जणांना डिस्चार्ज आजपर्यंत एकूण बाधीत ५०३१


कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि १२


   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ३, तिरुपती सिटी येथील १, जैन चौक परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील ३, लाखाळा येथील ४, योजना कॉलनी परिसरातील १, चांडक ले-आउट परिसरातील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, आययुडीपी कॉलनी परिसरातील १, माऊलीनगर येथील १, इतर ठिकाणचा १, अनसिंग येथील २, जांभरूण येथील १, राजगाव येथील १, दापुरा येथील १, सुपखेला येथील ४, उमरा कापसे येथील १, सावरगाव बर्डे कॅम्प येथील १, मालेगाव शहरातील बसस्थानक परिसरातील १, अकोला फाटा परिसरातील १, इराळा कॅम्प परिसरातील १, मसला पेन येथील १, नागरतास येथील १, आमखेडा येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, हराळ येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, इतर ठिकाणचे १०, कवठळ येथील २, कारंजा लाड शहरातील ममता नगर येथील १, वाणीपुरा येथील १, नगरपरिषद कॉलनी परिसरातील १, गायत्री नगर येथील ६ सिंधी कॅम्प येथील १, इतर ठिकाणचे २, लोणी येथील १, पारवा पोहर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


   दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४९ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत जिल्ह्याबाहेर आणखी ३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे.