वाशिम जिल्ह्यात आज आढळले २० कोरोना बाधित तर ५८ जणांना डिस्चार्ज,एक्टिव रुग्ण फक्त ४८७
कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि २७
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, अनसिंग येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील फाळेगाव येथील ६, सनगाव येथील २, आसेगाव येथील ३, सार्सी येथील १, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील १, कारंजा लाड शहरातील शिवाजी नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, तसेच इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या २ मृत्यूची नोंद आज घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याबाहेर आणखी ७ बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या १२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ५६३९
ऍक्टिव्ह – ४८७
डिस्चार्ज – ५०१५
मृत्यू – १३६
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)