नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आमदार पाटणी यांचा अभिनंदन ठराव!
कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि२२
विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी कोरोनाच्या संकटात एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केले. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कार्यान्वित यंत्रणेच्या अडचणी लक्षात घेता, बैठकांच्या माध्यमातून शासन तसेच प्रशासन स्तरावर केलेला पाठपुरावा, कोविड रूग्णांचा शोध घेण्यासाठी ‘डोअर टू डोअर’ रॅण्डम चाचण्या, गोरगरीब व प्रवासी श्रमिकांसाठी अन्नदान, आमदार निधीतून मुक जनावरांसाठी ३२ हजार लिम्पी लस तसेच कोविडच्या झटपट निदानासाठी ६ हजार ‘रॅपिड अॅन्टिजन किट’ उपलब्ध करून दिल्या. आमदार पाटणी यांच्या कार्याचा गौरव म्हणून १९ ऑक्टोंबर रोजी कारंजा नगर परिषदेमार्फत सर्वसाधारण सभेत त्यांचा अभिनंदन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सर्वसाधारण सभेत नगरसेविका सौ.प्राजक्ता उमेश माहितकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडतांना सांगितले की, जागतीक संकटात एक लोकप्रतिनिधी म्हणून आ.राजेंद्र पाटणी यांनी केलेले कार्य हे सर्वशृत आहे. यामध्ये प्रामुख्याने विकास निधीतून ६ हजार ‘रॅपिड अॅन्टीजन किट’, मुक जनावरांसाठी ३२ हजार ‘लिम्पी’ लस, बैठकांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेच्या पाठीशी राहून अडीअडचणींचे निवारण तसेच मार्गदर्शन याशिवाय आरोग्य कर्मचार्यांसाठी अतिरिक्त पीपीई किट, सॅनिटायझर तर कोविड रूग्णांकरिता दोन वेळचे जेवण, नास्ता तसेच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला. परजिल्ह्यात/राज्यात गेलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांचे बँक खात्यात पैसे पाठवून राहण्याची व जेवणाची केलेली व्यवस्था तसेच प्रवासी श्रमिक मजुरांसाठी जिल्हा महामार्गावर केलेले अन्नदानाचे कार्य हे सर्वशृत आहे. याच कारणास्तव कारंजा शहर कोरोना मुक्तीच्या मार्गावर आहे. या संकटकाळात केलेले कार्य हे निश्चितच अभिनंदनीय असून खर्या अर्थाने कोरोना योध्दाचा सन्मान असल्याचे मत सौ.प्राजक्ता माहितकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सौ.माहितकर यांनी सूचक म्हणून ठराव मांडला ज्यास सत्ताधारी गटनेते सभापती फिरोज शेकुवाले यांनी अनुमोदन दिले. यावेळी नगराध्यक्ष शेषराव ढोके यांचेसह उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.