कारंजा शहर व तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायकानी आपली व सहकार्याची कोरोना लसिकरणसाठी त्वरित माहिती द्यावी- डॉ भाऊसाहेब लहाने वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्नालय कारंजा
कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि २७
कोरोना लसिकरणाची लवकरच सुरुवात होणार असून त्याचे प्रथम पाउल म्हणून कारंजा शहर व तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायकानी आपली व त्यांच्या सोबत काम करणारे स्टाफ ची कोरोना लसिकरन करिता त्वरित माहिती पुरविन्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालय कारंजा चे वैद्यकीय अधिक्षक डॉ भाऊसाहेब लहाने यांनी केले आहे
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन शहरातील व तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रनेत कार्यरत सर्व डॉक्टर व त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सहाय्य करणारे त्यांचे कर्मचारी,प्रयोगशाळा तंत्र, व इतर कर्मचारी यांची माहिती प्रथम टप्प्यामध्ये लसीकरण करण्याकरता आवश्यक आहे. कारंजा शहरातील सर्व डॉक्टरांनी सदर माहिती आजच वैधकिय अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय कारंजा डॉ. भाऊसाहेब लहाने यानी खालील email id वर उपलबध करून द्यावी. ms_karanja@rediffmail.com
ग्रामीण भागातील डॉक्टरांची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जमा झालेली आहे हे फक्त शहर विभागाची माहिती अप्राप्त आहे त्यामुळे सदर बाबीचे गांभीर्य ओळखून आज चार वाजेपर्यंत सर्वांनी माहिती पाठवावी खाली पाठवलेल्या एक्सेल शीट या फॉरमॅटमध्ये आपण माहिती उपलब्ध करून द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे