योग्य आहार हाच डायबिटीज वरील एकमेव उपाय !* डॉक्टर उदय नावलेकर यांचे प्रतिपादन

योग्य आहार हाच डायबिटीज वरील एकमेव उपाय !


      डॉक्टर उदय नावलेकर यांचे प्रतिपादन


 कारंजा: (अमित संगेवार)दि २९


शरद व्याख्यानमालेच्या पुष्प २ मध्ये डॉ नावलेकर यांनी डायबटीज वर मार्गदर्शन केले डायबिटीज वर अनेक तज्ञांनी वेगवेगळे उपाय व थेरपी सांगितली आहे. त्यामध्ये खूप भिन्नता आहे. काहींच्या मते दिवसातून दोन वेळा जेवण करावे तर काहींच्या मते दिवसातून एकच वेळ जेवण घ्यावे. या सर्व उपायांचा परिणाम आपल्याला आपल्या अनुभवातून योग्य पद्धतीने घेता येऊ शकतो .डायबिटीज हा चुकीच्या आहारामुळे झालेला आजार असून त्यावर मेडिसिन ऐवजी योग्य आहार हाच एकमेव उपाय असल्याचे मत यवतमाळ येथील डॉक्टर उदय नावलेकर यांनी व्यक्त केले .


      कारंजा लाड येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या ऑनलाइन व्यासपीठावरून दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते .क्लिजिंग थेरपीआणि आरोग्य हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता .प्रारंभी प्राचार्य ठाकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर डॉक्टर रवी ठाकरे यांनी त्यांचा परिचय करून दिला .पुढे बोलताना डॉक्टर उदय नावलेकर म्हणाले की, ही एक नॅचरल थेरेपी असून त्यामध्ये क्लिजिंग चे २४ प्रकार सांगितलेले आहेत .त्यापैकी लिव्हर क्लिजिंग अतिशय महत्त्वाची थेरेपी मानली गेली आहे. यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, मोसंबी संत्री या फळांचा ज्यूस यांचे मिश्रण करून डोस दिल्या जातात हे करताना अनेकदा रुग्णांना शौचास जावे लागते ,उलटी होते , मात्र त्याचा परिणाम सकारात्मक होतो .रुग्णांना तब्येतीत खूप बदल झाल्याची अनुभूती येते .डॉक्टर पियुष सक्सेना यांनी या थेरपी वर संशोधन केलेले आहे आणि त्यांनी असा दावा केला की यामुळे सहा महिनेपर्यंत हार्ट अटॅक येऊ शकत नाही. श्री उदय नावलेकरांनी त्यांच्या बरोबरच ,आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. पियुष सक्सेना या तज्ञांना व्यासपीठावर ऑनलाईन आमंत्रित केले, आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी उरलेल्या इतर क्लिजिंग ची माहिती दिली. ते म्हणाले की या थेरपीमुळे ९० टक्के हेल्थ प्रॉब्लेम ठीक होतात. आपण दिवसातून जो आहार घेऊ नये ,तो चवीने घेतो . चहा, समोसा व इतर तळलेले पदार्थ अॅसिडीक असतात, तर हिरव्या भाजीपाला, जंगलातील हवा, पाणी हे अल्काइन असतात .म्हणून "जंगल मे रहो और कच्चा खावॊ "असा सल्ला त्यांनी दिला .रुग्णांचा आहार कसा असावा याविषयी बोलताना डॉक्टर नावलेकर म्हणाले की आपल्या आहारात पोळी वर्ज्य करावी.


      भाकरी व भात खावे आणि राजमा ,उडीद ,मूग ,हरभरा या डाळींचा वापर करावा, कारण यामध्ये अधिक प्रोटिन्स असतात .डायबेटिज रुग्णांनी जास्त व्यायाम करू नये. चार पाच किलोमीटर फिरण्याची गरज नाही .कारण त्यामुळे जास्त भूक लागू शकते. ड्रायफ्रूट हे भिजवून खाल्ल्यास फायदेशीर ठरतात .वजन जास्त असलेल्या रुग्णांनी दूध व दुधाचे पदार्थ खाऊ नये. तसेच रुग्णांनी उपवास अजिबात करू नये .ज्यूस आरोग्यासाठीअतिशय पोस्टीक मानल्या गेला आहे. टोमॅटो ,सफरचंद ,गाजर , काकडी तसेच पालक ,पुदिना, आवळा यांचा ज्यूस घ्यावा. मात्र ज्यूस करण्‍यापूर्वी मिठात चांगले धुऊन घ्यावे .देठाचा वापर करू नये .ज्यूसमुळे ऍसिडिटी निर्माण होत नाही .आपलं शरीर हे अतिशय सुंदर आहे .सुंदर मन व सुंदर आरोग्य प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे .आपलंआरोग्य औषधी विना असणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्याच्या पूर्तिकरता सजग रहावे ,असे आवाहन त्यांनी केले .


   केतन गोडबोले यांनी शारदास्तवन म्हटले. तर प्रशांत खानझोडे यांनी आभार मानले. संचलन महेंद्र धनस्कर यांनी केले.