वाशिम जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; ४१ जणांना डिस्चार्ज,तर ५४८ उपचार सुरु

वाशिम जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; ४१ जणांना डिस्चार्ज,तर ५४८ उपचार सुरु


कारंजा (संदीप क़ुर्हे) दि १५


    वाशिम जिल्ह्यात आज आणखी ५२ कोरोना बाधित आढळले असून ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे तर ५४८ उपचार सुरु आहेत


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील १, टिळक चौक येथील २, सुंदरवाटिका येथील १, अनसिंग येथील ५, बोरखेडी येथील १, चकवा येथील १, काटा येथील १, तांदळी येथील १, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर परिसरातील २, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, बियाणी नगर येथील १, रिसोड तालुक्यातील रिठद येथील १, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, देगाव येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील संतोषी नगर येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे २, नाईक नगर येथील ४, दापुरा येथील ३, कोंडोली येथील १, कारंजा लाड शहरातील रेस्ट हाऊस जवळील १, शिव नगर येथील २, काजळेश्वर येथील १, वाल्हई येथील १, महागाव येथील २, पारवा कोहर येथील ७, शेवती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.