जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आमदार पाटणी यांचा अभिनंदन ठराव.

वाशिम जिल्ह्या परिषदेच्या स्थायी समितीत आमदार पाटणी यांचा अभिनंदन ठराव.


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १७


    कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन किट’ असो वा जनावरांना झालेली ‘लिम्पी’ रोगाची लागण, आमदार पाटणी यांनी तत्परतेने पाऊल उचलत आपल्या स्थानिक विकास निधीमधून ३२ हजार लस तसेच ६ हजार रॅपिड अ‍ॅन्टीजन किट उपलब्ध करून दिल्या. आमदार पाटणी यांच्या नियोजनात्मक कामांमुळे समाधान व्यक्त करत जि.प.सदस्य तथा गटनेते उमेश पाटील ठाकरे यांनी त्यांचा अभिनंदन ठराव स्थायी समितीसमोर मांडला ज्यास जि.प.सदस्य दिलीप मोहनावाले यांनी अनुमोदन देत जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी अभिनंदन केले.   


प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील दुग्ध जनावरांमध्ये लम्पी या जीवघेण्या त्वचारोगाची मोठ्या प्रमाणात लागत होत आहे. तातडीने उपाययोजना करून औषधोपचार व लस उपलब्ध करून द्यावी यासाठी आ.राजेंद्र पाटणी यांनी पावसाळी अधिवेशामध्ये कपात सुचनेच्या माध्यमातुन शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना.सुनिल केदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी देखील केली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हा नियोजन निधीला कात्री लावल्यामुळे परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेत आ.राजेंद्र पाटणी यांनी स्थानिक विकास निधीमधुन ३२ हजार लस उपलब्ध करून दिल्या. 


जनावरांच्या ‘लिम्पी’ रोगासंदर्भात उपलब्ध करून दिलेला निधी हा बहुदा राज्यातील पहिला प्रयोग असेल. आमदार पाटणी यांच्या नियोजनात्मक कामांमुळे समाधान व्यक्त करत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव कुपटा जि.प.सदस्य तथा गटनेते उमेश पाटील ठाकरे यांनी स्थायी समितीसमोर मांडला. कोळंबी जि.प.सदस्य दिलीप मोहनावाले यांनी अनुमोदन दिले. ज्यास जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे तसेच जि.प.सदस्य चरण गोटे यांनी आमदार पाटणी यांचे अभिनंदन केले.