आदित्य केंद्रे(ओरंगाबाद)यांची आय आय टी मुंबई साठी निवड.

आदित्य केंद्रे(ओरंगाबाद)यांची आय आय टी मुंबई साठी निवड.


कारंजा:(प्रतिनिधी)


     नुकत्याच झालेल्या जेईई इंजिनीअरिंग प्रवेश परिक्षेत आदित्य केंन्द्रे यांनी घवघवीत यश संपादन करीत अभियांत्रिकी क्षेत्रात भारतात अग्रगण्य असलेली व तिसऱ्या क्रमांकाची संस्था आय आय टी मुंबई येथे निवड झाली आहे. 


आदित्य हे कारंजातील स्व. प्रभुजी नानाजी गर्जे कारंजा लाड यांचे पणतु असुन श्री. सुग्रीव जी केंन्द्रे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. 


सदर निवडी करता त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन वंजारी समाजासाठी हि अतिशय अभिमानास्पद बाब आहे.कारंजातील जेष्ठ संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव गर्जे तसेच समस्त वंजारी परिवार कारंजा लाड कडुन त्यांचे कौतुक करण्यात आले आहे