कारंजात आगामी संनोंउत्सव नवदुर्गा उत्सव व ईद ए मिलाद निमित्य शहर वासियाना पोलीस अधीक्षक वाशिम यांनी केले मार्गदर्शन
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १३
कारंजा तालुक्यातील आगामी संनोंउत्सव नवदुर्गा उत्सव व ईद ए मिलाद निमित्य शहर वासियाना पोलीस अधीक्षक वाशिम यांनी येणारे उत्सव साधेपनाने साजरा करुण कोव्हीड १९ के पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे पोलिस अधिक्षक वाशिम यांचे अद्यक्षते खाली
उपविभागीय पोलिस अधिकारी कारंजा यांचे मार्गदर्शनात ठाणेदार कारंजा शहर यांचे उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून व धार्मिक व जातीय सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून शांतता समिती ची सभा महेश भवन कारंजा येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला तहसीलदार धीरज मांजरे,दादाराव डोलारकर मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा व नगराध्यक्ष कारंजा हे उपस्थित होते तसेच पोलीस निरीक्षक मानोरा व पोलीस निरीक्षक धनज हे सुद्धा उपस्थित होते. सभे दरम्यान मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी नवदुर्गा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत आवाहन केले. तसेच सण 2019 मधील उत्कृष्ट कामगिरी करणारे नवदुर्गा मंडळ यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . सदर मिटिंग करीता पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, पत्रकार ,प्रतिष्ठित नागरिक, व नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी, असे एकूण 200 ते 225 जनसमुदाय उपस्थित होता.