आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्था वाल्हई तर्फे कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयात विद्याश्री शिष्यवृत्तीचे वाटप
कारंजा: (संदीप क़ुर्हे)
आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्था वाल्हई चे संस्थापक प्रा. निर्मलसिंह ठाकुर व अध्यक्षा कविता ठाकुर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथे विद्याश्री शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचेचे पालन करित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख तर प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक दिलीप सावळे आणि आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेच्या कार्यक्रम समन्वयक नीता तोडकर खाडे उपस्थित होत्या.उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
यावेळी आदिशक्ती महिला बहुउद्देशिय संस्थेच्या समन्वयक नीता तोडकर खाडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे उद्दिष्टे व शैक्षणिक कार्य विषद केले. तसेच गेल्या 6 वर्षांपासून संस्था अविरतपणे ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे असे म्हटले.
यावेळी अश्विनी हळदे,सुहानी हळदे, सायली घोडे,शुभांगी पानझाडे,कांचन पानझाडे या विद्यार्थिनींना विद्याश्री शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना बॅग, पाठ्यपुस्तके, रजिस्टर व इतर शैक्षणिक वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कु.अरुणा देशमुख यांनी आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेचे आभार मानले.कार्यक्रमाचे संचलन चव्हाण तर आभार प्रदर्शन गोपाल खाडे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले.