वाशिम जिल्ह्यातुन कोरोना होतोय हद्दपार जिल्ह्यात आढळले फक्त २९ कोरोना बाधित २६ जणांना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यातुन कोरोना होतोय हद्दपार जिल्ह्यात आढळले फक्त २९ कोरोना बाधित २६ जणांना डिस्चार्ज


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २९


    वाशिम जिल्ह्यातुन आता कोरोना हद्दपार होत असल्याचे जाणवत आहे कारण कालच्या अहवालात फक्त 8 रुग्ण आढळले होते तर आज जिल्ह्यात आढळले २९ कोरोना बाधित सापडले असून २६ जणांना डिस्चार्ज केले आहे.


      काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, जुनी आययुडीपी येथील १, पोस्ट ऑफिस जवळील २, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील वडप येथील १, पांगरी कुटे येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, संताजी नगर येथील १, महालक्ष्मी विहार परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, फाळेगाव येथील ३, मानोली येथील २, शाहपूर येथील १, तऱ्हाळा येथील २, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील २, मोठे राम मंदिर परिसरातील ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


  दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या २ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.


    कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ५६७६


ऍक्टिव्ह – ४६३


डिस्चार्ज – ५०७३


मृत्यू – १३९


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)