वाशिम जिल्ह्यात आज ६१ कोरोना बाधित ४५ जणांना डिस्चार्ज
कारंजा (संदीप क़ुर्हे)दि २२
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी येथील २, आनंदवाडी येथील १, गवळीपुरा येथील १, चंडिकावेस येथील १, सिव्हील लाईन येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, अल्लाडा प्लॉट येथील २, सिंचन वसाहत येथील १, संत नगर परिसरातील १, काटीवेस येथील १, लाखाळा परिसरातील १, कोकलगाव येथील १, केकतउमरा येथील १, मोठा उमरा येथील २, सुपखेला येथील १, बोरखेडी येथील १, नागठाणा येथील १, रिसोड शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, इतर ठिकाणची १, चिचांबा पेन येथील १, कुऱ्हा येथील १, हराळ येथील २, मांगवाडी येथील १, व्याड येथील २, गोभणी येथील २, मसला पेन येथील १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील राजस्थानी चौक येथील १, जनुना येथील १, पार्डी ताड येथील ३, पोघात येथील १, शहापूर येथील १, फाळेगाव येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. १४ येथील ४, शहरातील इतर ठिकाणची १, वसारी येथील १, इराळा येथील १, जऊळका येथील ३, कारंजा लाड शहरातील पहाडपुरा येथील १, खेर्डा येथील ३, कामरगाव येथील १, धामणी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसातील आणखी २ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.