उदय सुधाकर गर्जे यांची कृषी पदवीधर संघटनेच्या प्रदेशध्यक्ष पदि नियुक्ती, अल्पकाळात उमटविला आपला कार्याचा ठसा!

उदय सुधाकर गर्जे यांची कृषी पदवीधर संघटनेच्या प्रदेशध्यक्ष पदि नियुक्ती, अल्पकाळात उमटविला आपला कार्याचा ठसा!


    कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि ३०


     नुकत्याच झालेल्या कृषी पदवीधर संघटनेच्या फेर बदलांमध्ये वाशिम जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उदय सुधाकर राव गर्जे यांची संस्थापक अध्यक्ष महेश कडुस पाटील यांनी फेरनिवड करित युवक प्रदेशाध्यक्ष पदि नियुक्ती केली आहे. उदय गर्जे यांची पारदर्शक कार्यप्रणाली व संघटनेच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न पाहुन काही दिवसांपूर्वी च त्यांना विद्यार्थी आघाडी निरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. 


      सदर निवडीबाबत चर्चा केली असता संघटना वाढीसाठी भर देण्याचे, शेतकरी व कृषी पदवीधर बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे उद्दिष्ट त्यांनी बोलुन दाखवले तसेच संघटनेच्या विश्वासाला खरे उतरुन दाखविण्याची मनिषा बोलुन दाखवली.


     सदर नियुक्ती बाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असुन गर्जे यांनी संस्थापक अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व शुभचिंतकांचे आभार मानले आहेत व अधिक ताकदीने संघटन वाढविण्याचे कळविले आहे.