वाशिम जिल्ह्यात आज आणखी २१ कोरोना बाधित ६१ जणांना डिस्चार्ज एकूण पॉझिटिव्ह ५५६६ एक्टिव्ह – ५५६ डिस्चार्ज ४८८२

वाशिम जिल्ह्यात आज आणखी २१ कोरोना बाधित ६१ जणांना डिस्चार्ज एकूण पॉझिटिव्ह ५५६६ एक्टिव्ह – ५५६ डिस्चार्ज ४८८२ 


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २४


    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम कारागृह निवासस्थाने परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मोहगव्हाण येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील नागी येथील १, फाळेगाव येथील १, लाठी येथील २, मानोरा तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील १, पोहरादेवी येथील ३, कारंजा लाड शहरातील नूतन कॉलनी परिसरातील १, इंदिरा नगर येथील १, काकडशिवणी येथील ६, कामरगाव येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या ४ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.


     कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ५५६६ 


ऍक्टिव्ह – ५५६


डिस्चार्ज – ४८८२


मृत्यू – १२७


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)