वाशिम जिल्ह्याला मिळतोय दिलासा आज वाशिम जिल्ह्यात ६८ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४५७० एक्टिव रुग्नसंख्या ५८६

वाशिम जिल्ह्याला मिळतोय दिलासा आज वाशिम जिल्ह्यात ६८ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४५७०  एक्टिव रुग्नसंख्या ५८६


   कारंजा : (संदीप क़ुर्हे) दि ४


     वाशिम जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त अहवाला नुसार जिल्ह्याला दिलासा मिळत असल्याचे बातमी आहे आज वाशिम जिल्ह्यात ६८ कोरोना बाधीतांची नोंद झाली असून एकुण संख्या ४५७० जरी असली तरी उपचार घेणारे रुग्नसंख्या मात्र ५८६ आहे


     काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गणेशपेठ येथील २, काळे फाईल येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, नालंदा नगर येथील १, लक्झरी बसस्थानक परिसरातील १, करुणेश्वर मंदिर परिसरातील १, लाखाळा येथील २, सिव्हील लाईन येथील १, कारागृह परिसरातील १, साखरा येथील १, कळंबा महाली येथील १, पिंपळगाव येथील ४, केकतउमरा येथील १, रिसोड तालुक्यातील खडकी येथील १, मोठेगाव येथील २, भरजहांगीर येथील १, मानोरा शहरातील १,             मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर येथील ८, वरुड रोड येथील २, जांब रोड येथील १, एसबीआय परिसरातील १, धनगरपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंप्री अवगण येथील ३, सोनाळा येथील १, वनोजा येथील ४, वारा येथील १, सोनखास येथील १, पिंपळखुटा येथील १, स्वासीन येथील १, घोटा येथील १, शेलूबाजार येथील २, कारंजा लाड शहरातील एम.जे. स्कूल जवळील १, बाबरे कॉलनी परिसरातील ३, एसबीआय परिसरातील १, टिळक चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, रामनगर येथील १, यावर्डी येथील १, पिंपळगाव येथील ३, नागलवाडी येथील १, धामणी खडी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


     दरम्यान, आज ४७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ४५७०


ऍक्टिव्ह – ५८६


डिस्चार्ज – ३८८८


मृत्यू – ९५


इतर कारणाने मृत्यू - १