देशातील दारिद्र्यरेषा ठरवण्याचा निकष बदलणार - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची महत्वाची माहिती
कारंजा:(वृत्तकेसरी न्यूज़ नेटवर्क)
केंद्र सरकार आता दारिद्र्य रेषा ठरविण्याचे निकष बदलणार बदलनार असून भविष्यात दारिद्र्य रेषा ठरविताना व्यक्तीचे उत्पन्न नव्हे, तर त्याचा राहणीमानाचा दर्जा गृहीत धरला जाणार आसल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने म्हटले आहे
तसी दारिद्र्य रेषा हि संकल्पना आपल्यासाठी कदाचित नवीन असू शकते - मात्र आपण येव्हढे समजून घ्या कि - ज्या लोकांना आपल्या मूलभूत गरजा-
भागविण्यासाठी उपलब्ध होणारी साधने अपुरी पडतात, अशा माणसांची स्थिती म्हणजे दारिद्र्य रेषा होय - यासाठी वेगवेगळे निकष असतात
दरम्यान आता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने जारी केलेल्या कार्यदस्तात याविषयी माहिती देण्यात आली आहे - ग्रामविकास मंत्रालयाने म्हटले आहे कि
सध्याची दारिद्र्य रेषेची सीमा वादग्रस्त ठरलेली आहे - तेंडुलकर समितीने निर्धारित केलेली दारिद्र्य रेषा खूपच खाली असल्यामुळे वाद निर्माण होत आहेत
त्यामुळे ते आता बदलण्यात येणार आहे सध्या दारिद्र्य रेषा ठरविताना व्यक्तीचे उत्पन्न गृहीत धरले जाते - मात्र आता नव्या निकषांत राहणी मानाचा दर्जा, घर, शिक्षण, तसेच स्वच्छता देखील गृहीत धरल्या जाणार आहे
त्यामुळे आता दारिद्र्य रेष ची व्याख्या बदलनार आहे