१ नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडर वितरण पद्धतीत होतील मोठे बदल
कोणते बदल होणार ते पहा
कारंजा:( वृत्तकेसरी न्यूज़ नेटवर्क)
सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी गैस कंपन्या डिलिव्हरीसाठी DAC म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सिस्टम अमलात आणनार आहे
हे नवीन सिस्टिम १ नोव्हेंबरपासून लागू करणार आहेत - ही सिस्टिम नेमकी कशी असेल ते पहा कशी आहे DAC सिस्टिम
या नवीन सिस्टिम नुसार आता बुकिंग नंतर सिलिंडरची घरापर्यंत सरळ डिलिव्हरी केली जाणार नाही -तर त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल
म्हणजे तुम्ही डिलिव्हरी बॉयला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही - आता यामध्ये एखाद्या ग्राहकाने वितरकाकडे
त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसेल - तर डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ऍपच्या मदतीने तुम्हचा नवीन नंबर अपडेट करता येईल - आणि त्यानंतर कोड जनरेट करता येईल
तेल कंपन्यानि हि यंत्रणा सुरवातीला जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू केली आहे - आता हळूहळू इतर शहरांमध्ये ही यंत्रणा लागू होईल -असे स्पस्ट करण्यात आले आहे
हि नवी यंत्रणा लागू झाल्यावर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील - यानुसार घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी देखील रोखली जाऊ शकते
आता सर्वात महत्वाचे म्हणजे ही योजना केवळ घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरसाठी असेल - व्यवसायिक वापरासाठी घेत असलेल्या सिलेंडरसाठी ही योजना लागू होणार नाही.