कारंजा तालुक्यात विज पडून २ शेतकऱ्यांच्या मृत्यु तर व १ जखमी दोन चारचाकी व दोन दुचाकी च्या विचित्र अपघातात २ मृत्युमुखी व २ गंभीर जखमी

कारंजा तालुक्यात विज पडून २ शेतकऱ्यांच्या मृत्यु तर व १ जखमी


    दोन चारचाकी व दोन दुचाकी च्या विचित्र अपघातात २ मृत्युमुखी व २ गंभीर जखमी


 कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि ११


    आजची दुपार कारंजा तालुक्यावर घाताची मालिका घेवून आल्याने २ विचित्र अपघाता मालिका घडल्या आहेत आज दुपारी कारंजा तालुक्यात विज पडून २ शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला असून व १ युवक जखमी झाला आहे तर दुसऱ्या घटनेत जुडवा हनुमान जवळ झालेल्या अपघातात दोघाचा म्रत्यु झाला असून २ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे


   दुपारी शहरासह तालुक्यात विजेच्या गड़गड़ाहट सह प्रचंड पावसासह दोन ठिकानी विज पडली आहे ज्यामध्ये पिंपळगाव येथे ५५ वर्षीय नानासाहेब टोंग यांचा तर नारेगाव येथील धीरज दोरक या १६ वर्षीय युवकाचा विज पडूंन मृत्यु झाल आहे तर सोबत असलेले ४५ वर्षीय वडील जखमी झाले आहेत 


    तर जुडवा हनुमान जवळ झालेल्या विचित्र अपघातात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिका पूजा चव्हाण ह्या आपली डयूटी नंतर आपल्या दिरा सोबत म्हणजे अक्षय राठोड सोबत दुचाकी वर घरी काकडशिवनी जात असताना पूजा चव्हाण ह्या कारंजा कोव्हीड वार्ड मध्ये कार्यरत असल्याचे समजते  चारचाकी च्या अपघातात त्यांचा दिरासह म्रत्यु झाल्याचे वृत्त आहे याच अपघातात ऋषिकेश लळे वय २५ तर गणेश सांगोले कारंजा वय ५५ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे