वाल्मीक नगर मधील सामाजिक सभागृहाचे भाजपा शहर अद्यक्ष ललित चांडक यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न
कारंजा (संदीप क़ुर्हे )
स्थानिक आमदार राजेंद्रजी पाटनी यांचे निधितुन ९ लाख रु खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वाल्मीक नगर येथील सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन कारंजा भाजपा चे शहर अद्यक्ष ललितजी चांडक यांचे हस्ते सम्पन्न झाले. भूमिपूजना प्रसंगी
वाल्मीक नगर परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते बंटी डेंडुळे, मोहन पंजवानी शहर उपाध्यक्ष भाजपा ,शशिकांत वेरुलकर शहर सरचिटणीस, जिगनेश लोड़ाया सोशल मीडिया संयोजक,तसेच वाल्मीक नगर परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते