बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे १६ पैकी १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण (शाळेचा निकाल शंभर टक्के)

बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे १६ पैकी १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण 


  (शाळेचा निकाल शंभर टक्के)


कारंजा :(प्रतिनिधी) 


    कारंजा-पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० चा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्य. विद्यालय, यावर्डीच्या इयत्ता ८ वीच्या १६ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र म्हणजे उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर परीक्षेत या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे 


    महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ८ वी साठी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. सदर परीक्षेला बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील १६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच या शाळेचा निकाल सदर शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के लागला आहे.


         अाचल संतोष ठाकरे या विद्यार्थिनीने २१२ गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.२०२ गुण मिळवून राधा नितेश रिठे ही विद्यालयातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तर १९८ गुण प्राप्त करून राधा गजानन ठाकरे व दिव्या संजय ठाकरे यानी शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.


        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालीनी ओलिवकर, गोपाल काकड व अनिल हजारे यांना दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष केशवराव खोपे, मुख्याध्यापक विजय भड व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावकरी मंडळी यांनी केले आहे.