सेवानिवृत्त मुख्याध्यापक,व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखिकरणाची परिगणना करून ७ व्या वेतन आयोगानुसार लाभ द्या.... सौ.संगीताताई शिंदे

सेवानिवृत्त मुख्याध्यापक,व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखिकरणाची परिगणना करून ७ व्या वेतन आयोगानुसार लाभ द्या....सौ.संगीताताई शिंदे 


कारंजा- (संदीप क़ुर्हे)


   शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत,ज्यावर विविध सामाजिक खाजगी संघटना आपापल्या स्तरावर शासनाला विनवण्या घालत आहे.अशात शिक्षकांचे मोठे नुकसान होतांना आपल्याला दिसत आहे,शिक्षक स्वतःही जीव धोक्यात घालून विविध आंदोलन शासन दरबारी करीत आहेत पण अद्याप कुठल्याही प्रकारचा न्याय हा शासनामार्फत मिळत नाही. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत ज्यामध्ये प्रमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जित रजेचा रोखीकरणाची परिगणना सातव्या वेतन आयोगानुसार करून लाभ देण्याबाबत अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.


 


      अमरावती विभागातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मार्च 2019 पासून अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले परंतु सदर कर्मचाऱ्यांना अर्जित रोखीकरणाचा लाभ नियमानुसार देण्यात येत नाही संपूर्ण राज्यात दिनांक 1 जानेवारी 2019 पासून सुधारित वेतन संरचनेनुसार सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाली असून माहे मार्च 2019 पासून सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अंशदान ग्रॅज्युएटी ही सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात आली परंतु अर्जित रजा रोखीकरणाची परिगणना अमरावती विभागातील वेतन पथक अधीक्षक मार्फत सहाव्या वेतन आयोगानुसार करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. कुठलेही परिपत्रक किंवा पत्र शासनाने काढले नसून हेतूपुरस्पर वेतन पथक अधीक्षका मार्फत सदर कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय होत आहे अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारी संघटनेच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहे ही सगळी परिस्थिती पाहता शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष सौ संगीताताई शिंदे यांनी माननीय शिक्षण उपसंचालक , विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती, विभाग अमरावती. यांना लक्षात आणून दिली व सदर विषय तात्काळ मार्गी लावावा अशी विनंती निवेदना मार्फत केली आहे.