वाशिम जिल्ह्यात ३९ कोरोना बाधितांची नोंद तर १०५ जणांना डिस्चार्ज
कारंजात रैपिड एंटीजन टेस्ट चा ३ रा टप्प्यात ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान दुकानदारानी तपासणी ला सहकार्य करण्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन
कारंजा ( संदीप क़ुर्हे) दि 3
वाशिम जिल्ह्यात प्रशासना च्या कार्याची दाखल आता कोरोना सुद्धा घेत असल्याचे आजच्या आकडेवारी वरुन दिसत आहे प्रशासना च्या आजच्या अहवालावरुन आज जिल्ह्यात ३९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
कोरोनाच्या रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा या करिता जिल्ह्या प्रशासन,जिल्ह्या आरोग्य यंत्रणा,तालुका पातळी वरील महसूल प्रशासन,आरोग्य यंत्रणा फार कशोसिने प्रयत्न करीत आहे परिणामी त्याला यश सुद्धा मिळत आहे
कारंजात रैपिड एंटीजन टेस्ट चा ३ रा टप्प्यात ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान दुकानदारानी तपासणी ला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हिल लाईन येथील ३, जुनी जिल्हा परिषद परिसरातील २, चांडक ले-आऊट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोनखास येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सवड येथील १, चिंचाबाभर येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील २, वाघी येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील २, गिरोली येथील ३, कारंजा लाड तालुक्यातील पोहा येथील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मालेगाव येथील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.