वाशिम जिल्ह्यात जिल्ह्या प्रशासनाचे कोरोनावर यशस्वी नियंत्रण, आज बाधितांचा आंकड़ा फक्त २१
तरीही खबरदारी आवशक्य
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दी ८
आपल्या वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कोरोनावर अंकुश ठेवन्यास प्रशासनाला यश आल्याचे मागील ३ दिवसाच्या आकडेवारी वरुन निदर्शनात येत आहे काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सुपखेला येथील १, काटा येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील १, मंगरूळपीर शहरातील १, मोहरी येथील ३,
कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील १, शासकीय निवासस्थान परिसरातील २, माजीदपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गुरुकृपा मेडिकल परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, गायत्री नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, महागाव येथील १, पिंप्री मोडक येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच भरजहांगीर येथील ६० वर्षीय महिलेच्या मृत्यूची व जिल्ह्याबाहेर आढळलेल्या ३१ बाधितांची नोंद आज घेण्यात आली आहे.