मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आंदोलन

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आंदोलन


कारंजा: ( संदीप क़ुर्हे)


    संताची भुमी असलेल्या या महाराष्ट्राच्या पावन भुमित विद्यमान सरकारने हॉटेल तसेच बार सुरू केलीत. मात्र राज्यातील धार्मिक स्थळे बंदच ठेवलीत. राज्य भरातील मंदिरं खुली करावीत यासाठी जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष ललित चांडक यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकार्‍यांनी तहसीलदार मांजरे यांना निवेदन देत मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्यापुर्वी शहरातील प्रसिध्द जन्मस्थळ असलेल्या श्री.गुरूमंदिर संस्थानसमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकारचे विरोधात घोषणा दिल्यात.


राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध सांप्रदायाचे साधुसंत तसेच धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यावतीने १३ ऑक्टोंबर रोजी राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने कारंजा येथील मंदिर विश्वस्त आणि वाशिम जिल्हा आध्यात्मिक आघाडीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. भाविकांच्या सांप्रदायाच्यावतीने कळकळीची विनंती करत जनभावनांचा आदर करून तात्काळ मंदीरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष ललित चांडक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे, महिला आघडी जिल्हाध्यक्षा सौ.मिनाताई काळे, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, शहर सरचिटणीस शशिकांत वेळुकर, रणजीत रोतेले, युवा मोर्चा शहराध्यक्ष अमोल गढवाल, महिला तालुका उपाध्यक्ष सौ.शारदाताई बांडे, शहराध्यक्षा सौ.पायल तिवारी, उत्तर भारतीय जिल्हा संयोजक ललित तिवारी, नगरसेविका सौ.प्राजक्ता माहितकर, सौ.अश्विनी सस्तीकर, सौ.रजनी राऊत, सौ.प्रिती धाकतोड, शहर उपाध्यक्ष अविनाश फुलंबरकर, अक्षय देशमुख, मनोज शिवाल, चिटणीस निखील घुडे, प्रविण धारस्कर, रविंद्र राऊत, अजय देवरणकर, विवेक साबळे, सविस जगताप, ज्ञानेश्वर काळे, श्रीकृष्ण , संदीप कुर्‍हे, सचिन किन्हीकर, पुंडलिकराव झोंबाडे, समिर देशपांडे, श्रीपाद रेवाळे, शुभम गिरी आदींचा सहभाग होता.