जिल्ह्यात कोरोनाची कासव गती सुरुच वाशिम जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; २५ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात कोरोनाची कासव गती सुरुच


वाशिम जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; २५ जण कोरोनामुक्त


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १७


     वाशिम जिल्ह्यात मिशन बिगैंन अंतर्गत शैक्षणिक संस्था वगळता सर्वच प्रतिष्ठानें सुरु रात्रि उशीरापर्यंत सुरु ठेवन्यास परवानगी देण्यात आली असताना जिल्ह्यात मात्र रुग संख्या कासव गतीने वाढताना दिसत आहे आजची उपचार घेणारे रुग्नसंख्या ही ६३८ असून आजपर्यंत ची एकूण रुग्नसंख्या ही ५२९२ झाली आहे


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी परिसरातील ३, पोस्ट ऑफिस जवळील १, काळे फाईल येथील २, शहरातील इतर ठिकाणची १, अनसिंग येथील ९, सावळी येथील ५, कोंडाळा येथील १, खंडाळा येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. अकरा येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसरातील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, सिटी हॉस्पिटल परिसरातील ४, बेले गल्ली येथील १, गोवर्धन येथील ३, बाळखेड येथील १, वाडी रायताळ येथील १, वाकद येथील १, कारंजा लाड शहरातील सहारा कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, जांब येथील १, पिंपळगाव येथील ३, उंबर्डा बाजार येथील ५, सोमठाणा येथील २, झोडगा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 


     दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांतील आणखी ४ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.