जिल्ह्यात आणखी ५३ कोरोना बाधित; ६३ जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आणखी ५३ कोरोना बाधित; ६३ जणांना डिस्चार्ज


कारंजा : (संदीप क़ुर्हे) दि ५


  प्रशासनाकडून प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील ३, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, दत्तनगर येथील २, समर्थनगर येथील १, शुक्रवार पेठ येथील १, लाखाळा येथील १, जैन कॉलनी येथील १, देवपेठ येथील १, गणेशपेठ येथील १, गणेशपेठ येथील १, आनंदवाडी येथील १, तोंडगाव येथील २, अनसिंग येथील १, जांभरुण भिते येथील १, वारा जहांगीर येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, रिसोड शहरातील गणेशनगर येथील १, डॉ. आंबेडकर चौक येथील १, मोठेगाव येथील १, नेतान्सा येथील १, मानोरा शहरातील २, वसंतनगर येथील ३, भिलडोंगर येथील १, मालेगाव शहरातील शिव चौक येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, वारंगी येथील १, जऊळका येथील ३, मंगरूळपीर शहरातील १, दाभाडी येथील ३, पिंपळखुटा येथील ३, सनगाव येथील १, सावरगाव येथील १, कारंजा लाड तालुक्यातील भामदेवी येथील ३, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६३ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच हराळ येथील ७४ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर आणखी ३४ बाधित आढळले असून त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे.