नववी ते बारावीची शाळा आता सोमवारपासून दुरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर होणार सुरु - विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी

नववी ते बारावीची शाळा आता सोमवारपासून दुरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर होणार सुरु - विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी


   कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २३


     १५ जून पासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालेले आहे हे सर्वश्रुत असतांना कोरोना मुळे राज्यात लोकडौन लागल्या मुळे राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्था ह्या आज पर्यंत तसेच पुढेही दिवाळी पर्यन्त बंद राहणार आहेत 


   दरम्यान राज्यातील शिक्षण विभागातर्फे राज्य सरकार कडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सह्याद्री वर सुरू करण्यात आला व ऑन लाइन शिक्षण प्रणाली सुरु केली आता नंववी व बारावी च्या विद्यार्थी चे नुकसान होउ नये म्हणून राज्य सरकार तर्फे  येत्या २६ ऑक्टोबर पासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर  ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण होणार - राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवरुन याबद्दल माहिती दिली 


       दरम्यान आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ज्ञानगंगा हा कार्यक्रम चालू होणार आहे 


  हा कार्यक्रम सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत प्रसारित केला जाणार आहे - राज्यातील शाळा चालू होतील किंवा नाही - 


   हे अजूनही निश्चित नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल - असे वरिष्ठाकडून सांगण्यात आले आहे