राज्य सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविला लॉकडाऊन -
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि ३०
महाराष्ट्रात राज्य सरकार ने ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता १ ते ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊनचा सहावा टप्पा असणार आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे
याआधी केंद्र सरकारने देशात ३० नोव्हेंबरपर्यंत अनलॉकचे - नियम तसेच लागू असतील असे जाहीर केले होते. तर आता केंद्र सरकारच्या या निर्णयाला अनुसरूनच राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे तसेच मिशन बिगिन अगेन’अंतर्गत सूट दिलेल्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील असे राज्यसरकारकडून सांगण्यात आले आहे
दरम्यान राज्य सरकारने शाळा, कॉलेज आणि अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही.
तसेच धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत सुद्धा कुठलाच निर्णय घेतला नाही