राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - राज्यातील जिम 25 ऑक्टोबरपासून होणार सुरु

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - राज्यातील जिम 25 ऑक्टोबरपासून होणार सुरु 


कारंजा(संदीप क़ुर्हे) दि २३


  राज्य सरकारने आता येत्या रविवारपासून म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून(दसऱ्या पासुन) जिम उघडण्यास परवानगी दिली आहे


   राज्य सरकारने आज शुक्रवारी परिपत्रक जारी करून - हा निर्णय जारी केला आहे 


        पहा कशी आहे नियमावली


मार्गदर्शक सूचनांची माहिती व्यायामासाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांना द्यावी 


व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे - अन्य व्यवस्थापकांची वारंवार आरोग्य तपासणी करणे


शारिरीक अंतर पाळणे ,हातांची स्वच्छता राखणे आणि मास्क घालणे बंधनकारक असेल 


  तसेच क्षेत्रफळांनुसार सुद्धा जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे आवश्यक आहे 


   व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करावे - उपकरणांमध्ये अंतर ठेवावे तसेच वापरानंतर त्यांचे सुद्धा निर्जंतुकीकरण करावे 


    तसेच दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर सुद्धा पुर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे